शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

प्रतापगडाची लढाई

ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.

शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधूसंभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना इस्लामच्या प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. तसेच खानाचा विजय व्हावा म्हणून वाईच्या ब्राम्हणांनी खानाकडून दक्षिणा घेउन मोठा होमयाग केला. शिवाजींनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.[संपादन]

सैन्यबळ

अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. अफजलखानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमि़ळ्वणी करूनकोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.

शिवाजी-अफजलखान भेट व व्दंद

शिवाजी महाराजांवर अफझलखान हल्ला करताना त्यांना वाचविणारा जिवा महाला (भगव्या वस्त्रात)

शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्धकरायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ १० नोव्हेंबर इ.स. १६५९ रोजी ठरली.

भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्या खालीचिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो वा जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. वाटेत शिवाजींना खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांने अडवले व वार केला परंतु शिवाजींनी त्याला ठार मारले. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले.शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.

मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले. दुसर्‍या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्य सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वा खाली मराठा घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली.

लढाईनंतर

आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुक्सान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बर्‍याच जणांना परत विजापूर ला पाठवण्यात आले.

पुढील १५ दिवसातच शिवाजी महाराजांनी शिवाजीमहाराजांनी यानंतर सातारा, कोल्हापूर कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला

शिवराज्याभिषेक सोहळा ....

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम रामदास स्वामी आणि आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशिर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्याभवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले (तत्पूर्वी क्षत्रियधर्मानुसार कर्मे न केल्याबद्दल.). जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला ७०००होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.

दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. यानंतर दोन ब्रह्महत्या पूर्वी कधीतरी झाल्या होत्या याबद्दल ८००० होन प्रायश्चित्त म्हणून देण्यात आले.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता.अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्यनिनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणिधनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशिर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या.शिवराज की जयशिवराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरुन गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपतीम्हणून आशिर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशिर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले।

-http://jayshivray.blogspot.कॉम/

शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!


जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे भोसलेहे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

  • इ. स. 1625 ते 1628 - आदिलशाही
  • इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही
  • इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही
  • इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही
  • इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही


पुढे 1661-62 दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5, म्हणजेच 23 जानेवारी,1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.